सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दोन दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा वेळेआधी मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची शेतीकामाची धांदल सुरु झाली आहे. आज फलटण, माण तालुक्यात मान्सून पूर्व सरी बरसल्या.
जुनच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी मान्सून पूर्व सरी बरसल्या. महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला झाडे उन्मळून पडली. फलटणमध्ये एसटी स्टँड परिसरात पावसाचे पाणीच पाणी जमा झाले होते
You must be logged in to post a comment.