सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रजासत्ताक दिनानिमित्त सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा पत्र व भारतीय राजमुद्रेने सुशोभित राजदंडक भेट देण्यात आले. सिक्कीम राज्याच्या राज्यपाल पदाच्या कार्याची आठवण ठेऊन गणतंत्र दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या या सन्मानाने खासदार पाटील भारावून गेले.
राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की, श्रीनिवास पाटील यांनी सिक्किमचे राज्यपाल म्हणून काम केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. या संविधानिक पदाची सन्मानपूर्वक जबाबदारी पार पाडली. आपण सिक्किम राज्याची लोकसेवा आणि प्रगतीला प्राधान्य दिले. तसेच केंद्र व राज्य सरकार यांच्यामधील संबंध दृढ ठेवून आपली संघराज्य रचना मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रपती भवनाकडून मिळालेल्या आदेशानुसार कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे शासकिय ध्वजारोहण समारंभप्रसंगी प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल खासदार साहेबांनी मनापासून आभार मानले.
You must be logged in to post a comment.