सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्रासहीत मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी फॉस्ककॉनचा प्रकल्प गुजरातला पळवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा कंपन्यांवर दबावतंत्र वापरत हुकमाशाहीच सुरू केल्याचे दिसते. वास्तविक तो प्रकल्प तळेगाव दाभाडे येथे होणार होता. तसे असतानाही पंतप्रधान मोदी यांनी बळाचा वापर करून तो गुजरातला पळवला, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषेदत केला. प्रकल्पाला केंद्राची मदत हवी असेल तर तो गुजरातला उभा करा, असाही सज्जड दम देत त्यांनी कंपनीवर दबाव आणल्याचाही आरोप आमदार चव्हाण यांनी केला.
श्री. चव्हाण म्हणाले फॉक्सकॉनचा प्रकल्प अचानकपणे गुजरातला गेला त्यात पंतप्रधान मोदी यांच्या अवाजवी हस्तक्षेप स्पष्ट आहे. त्यामुळे मुंबईचे महत्व कमी करून गुजरातचे महत्व वाढण्याचाच घाट पंतप्रधान मोदींचा आहे. यापूर्वीही पालघरचा मरीन पोलीस प्रकल्प भाजपने हायजॅक केला. मुबंईत येणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रही पळवले. प्रत्येक मोठ्या प्रकल्पात पंतप्रधान मोदींनी आडकाठी आणून तो प्रकल्प गुजरातला हलवला आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली, मात्र त्या बुलेट ट्रेनचा मुंबईतील लोकांना काय उपयोग काय आहे, ते आता महाराष्ट्र सरकारने जाहीर करावे. पंतप्रदान मोदी यांच्या हट्टामुळे सर्व प्रकार सुरू आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या हट्ट पुढे राज्यातील डबल इंजिन सरकारचे काहीही चालत नाही हेही दिसून येते. श्री चव्हाण म्हणाले, मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे माहित नाही. पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे. काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा. अशी मागणी ऑगस्ट २०२० मध्ये केली होती. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मागणी मान्य केली.
You must be logged in to post a comment.