सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : काँग्रेस पक्ष सोडून त्यांना लवकर मोठं व्हायची घाई झाली होती,असा टोला आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
दहिवडी नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज दहिवडी येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी हरणाई सुत गिरणी चे चेअरमन रणजीत देशमुख, काँग्रेस चे प्रदेश निरीक्षक श्रीरंग चव्हाण जिल्हा निरीक्षक राजेंद्र शेलार जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब माने, विश्वबंर बाबार महिला काँग्रेस अध्यक्षा नकुसाताई जाधव, सर्व उमेदवार व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री असतानाच्या काळातील झालेली कामे बघा व आताची काय परिस्थिती बघा. नगरपंचायत होऊनही दहिवडी शहराचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. त्याला लोकप्रतिनिधी चा नाकर्तेपणा जबाबदार आहे. मलकापूरसारखा दहिवडीच्या विकासाचा काँग्रेस ने 11 कलमी जाहीरनामा तयार केला असून जनतेने काँग्रेस च्या एकहाती सत्ता द्यावी.आम्ही पूर्ण विकास करू असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
You must be logged in to post a comment.