सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोमवारी कराडच्या सैदापूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून परतत असताना सैदापूर कॅनॉलजवळ त्यांना लोकांची गर्दी दिसली. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. यावेळी चौकशी केली असता या रस्त्यावर झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला जखमी झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांना समजले. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी गाडीतून खाली उतरत वृद्धेची विचारपूस केली. एवढेच नव्हे तर आपल्या ताफ्यातील एक गाडी देऊन या वृद्ध महिलेला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.
या वृद्ध महिलेच्या हाताला जबर मार लागला होता. तसेच आजीबाईंच्या डोक्यालाही दुखापत झाली होती. त्यामुळे आजीबाईंना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे गरजेचे होते. पृथ्वीराज चव्हाण मदतीला धावून आल्यामुळे ते शक्य झाले. आजपर्यंत कराडमधील जनतेने पृथ्वीराज चव्हाण यांची गुणात्मक कामगिरी पाहिली होती. मात्र, आज त्यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन झाल्याने नागरिक भारावून गेले. त्यामुळे कराड परिसर आणि सोशल मीडियावर या प्रसंगाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
You must be logged in to post a comment.