सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सह्याद्रीकन्या प्रियांका मंगेश मोहीते हिने जगातील दहाव्या क्रमांकाचे उंच असलेले माऊंट अन्नपुर्णा-X हा ८०९५ मीटर अथवा २६५४५ फुट उंचीचा पर्वत यशस्वीपणे पदाक्रांत केला.
एव्हरेस्टवीर गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहीते हिने जगातील दहाव्या क्रमांकाचे उंच असलेले माऊंट अन्नपुर्णा-X हे ८०९५ मीटर उंचीचा पर्वत य़शस्वीपणे पदाक्रांत केला. हे साहस पुर्ण करणारी प्रियांका ही पहिलीच भारतीय महिला ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे साहस पुर्ण करून ती लगेचच माऊंट धौलागिरी हे जगातील सातव्या क्रमांकाचे ८१६७ मीटर अथवा २६७९५ फुट उंचीचे शिखर आरोहणास जाणार आहे. आत्तापर्यंत प्रियांकाने माऊंट एव्हरेस्ट, माऊंट लोहत्से, माऊंट मकालू, माऊंट चो यू हे ८००० मीटर पेक्षा उंच असणारे हिमालयातले पर्वत सर केले आहेत.
You must be logged in to post a comment.