सातारकरांवर पाणी कपातीचे संकट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या मुख्य जलवाहिनीला पेट्री गावाजवळ गळती लागली आहे. हे गळती काढण्याचे काम गुरुवारी (दि.3) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार व शुक्रवार (३ व ४ मार्च) दोन दिवस सातारा शहराच्या पश्चिम भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती सातारा पालिकेचे प्रशासन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पत्रकाद्वारे दिली.

शहराच्या पश्चिम भागातील विशेषतः बोगदा परिसर पोळ वस्ती बालाजी नगर मंगळवार पेठ व डोंगर परिसरातील भागाला गुरुवारीपाणीपुरवठा होणारनाही किंवा कमी दाबाने होईल. कारण गळती काढण्याचे काम सुमारे आठ तास चालणार असल्याने पावर हाउस व खाणी जवळच्या मुख्य टाकीला पाण्याची लेवळ कमी मिळणार आहे. याशिवाय शुक्रवारी (दि.४) पुरेशा क्षमतेने उपसा न झाल्याने कात्रेवाडा टाकी व पावर हाउस येथून पाणीपुरवठा होणारा शहराचा पश्चिम भाग विशेषता व्यंकटपुरा टाकी, गुरुकुल टाकी, कोटेश्वर टाकी, भैरोबा टाकी यांना कमी दाबाने पाणी मिळणार आहे आणि मंगळवार पेठेच्या पश्चिम भागासह चिमणपुरा पेठ, ढोणे कॉलनी, रामाचा गोट या भागांना यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी अत्यंत जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.

error: Content is protected !!