यशदाच्या जलप्रेमींनी जायगावकरांकडून घेतले जलसंधारणाचे धडे भेट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था “यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा पुणे येथे महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व व्याख्याते यांचे साठी “सहभागी पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन” या विषयावर प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष पाणलोट क्षेत्रास भेट देण्यासाठी जायगांव येथे आले होते.

जायगाव येथे “माथा ते पायथा” झालेल्या जैविक, अभियांत्रिकी, भूपृष्ठावरील, भूपृष्ठाखालील व नाल्यावरील उपचार या विषयीचा अभ्यास त्यांनी केला. तंत्रशुद्ध पद्धतीने डोंगराच्या पायथ्याला केलेली ३ मीटर रुंद,  2 मीटर खोल व  ५ की. मी. लांब अशी महाकाय व्हिडीटी , दगडी बांध,  सेमी-रिफलिंग सीसीटी व त्यावर लावलेली सीताफळ रोपे,  शेतातील बांधबंदिस्ती, जाळीचे बंधारे, मातीबांध, दगडी व सिमेंट बंधारे इत्यादी कामाचे महत्व यावेळी विषद केले गेले. तसेच शेतकरी BBF वर 95 % पेरणी करतात .

काळा गहू ,लाल तांदूळ ,काळा घेवडा,सोयाबीन,कांदा ,फळबाग याना संरक्षित पाण्याचे (ठिबक ,तुषार सिंचन)  नियोजन करून अशा पिकातून जास्तीचा नफा कमावू लागली आहेत व जातिवंत गाई म्हैशी सांभाळून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चारा पिके,मुक्त गोठा करून आपले उत्पादन वाढऊ लागली आहेत  या गोष्टीचा अभ्यास करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायत जायगांव यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!