बोंडारवाडी धरणासाठी २३ मार्चपासून धरणे : डॉ. पाटणकर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :जावली तालुक्यातील मेढा, केळघर विभागातील ५४ गावांसाठी महत्त्वाचा असलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न प्रशासन जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवत असल्यामुळे हे प्रश्न मार्गी लागेपर्यंत २३ मार्चला हुतात्मा दिनाचे औचित्य साधून श्रमिक मुक्ती दल व धरण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५४ गावांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इकारा श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

नांदगणे येथे कृती समितीच्या वतीने डॉ. पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाळी कार्यकर्त्याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, जावळी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, उद्योजक राजेंद्र धनावडे, आदिनाथ ओंबळे, विजयराव सावले, एकनाथ सपकाळ, विनोद शिंगटे, राजेंद्र जाधव, धनश्री शेळार, उषा उंबरकर, विद्या सुर्वे आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!