सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलने केली जात आहेत. आज सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्रीय यंत्रणांचा निषेध करण्यासाठी साताऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले.
नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय… मोदी सरकार चोर है… महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा… महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार… आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा अशा जोरदार घोषणा आणि फलक फडकावत काँग्रेस पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, कार्याध्यक्ष विजयराव कणसे, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोदी सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी देखील उपस्थिती लावली होती.
You must be logged in to post a comment.