सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा संप , ग्राहकांची गैरसोय

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खासगीकरणाला विरोध करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील नऊ कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. आज आणि उद्या सरकारी बँका राहणार बंद राहणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील सरकारी बँकांच्या शाखा कर्मचारी, अधिकाऱ्याविना ओस पडली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांकडून शाखांसमोर गटा गटात घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

error: Content is protected !!