साताऱ्यात बिल्डर्स असोसिएशनतर्फे ‘रचना’ प्रदर्शन

२६ ते २९ डिसेंबर पर्यंत आयोजन; नवीन घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असलेल्या ‘रचना २०२४’ या बांधकाम विषयक वास्तू प्रदर्शनाचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया,सातारा सेंटर तर्फे आयोजन करण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेले हे भव्यदिव्य प्रदर्शन साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर दिनांक २६ ते २९ डिसेंबर पर्यंत होत आहे.

दरम्यान, हे प्रदर्शन विनामुल्य असून सकाळी १०.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ‘रचना २०२४” चे मुख्य प्रायोजकत्व हे ‘Classic Group A Venture by Sumit Bagade’ तसेच ‘Scon Infra Prestress LLP’ यांनी स्विकारलेले आहे. तसेच या भव्यदिव्य अशा प्रदर्शनाचे सहप्रायोजक हे ‘कंग्राळकर असोसिएटस्’, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’, ‘कालिका स्टिल’, ‘परफेक्ट हाऊस प्रा.लि.’ यांनी स्विकारलेले आहे, अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष श्री.सुधीर ठोके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, असोसिएशनचे उपाध्यक्ष सयाजी भोसले, सेक्रेटरी हर्षद वालावलकर, ट्रेझरर पृथ्वीराज पाटील, कौन्सिल मेंम्बर सुधीर घार्गे, अनिल दातीर आदी पदाधिकारी, सदस्यांनी ‘ रचना २०२४’ प्रदर्शनाची माहिती दिली.

सुधीर ठोके म्हणाले, आपल्या स्वप्नातील घर शोधणाऱ्या तसेच रिअलईस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक सुवर्ण संधीच ठरते. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा स्थापन होऊन ३४ वर्षे झाली आहेत. येणारा काळ सातारा शहर व लगतच्या भागांमध्ये रिअल ईस्टेटसाठी, बांधकाम व्यवसायासाठी सुवर्णकाळ असेल असे जाणकारांचे मत आहे. सातारा व आजूबाजूच्या भागांमध्ये चालू असेलेले व नियोजित असलेले महत्वाकांक्षी शासकिय प्रकल्प यामुळे सातारा शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या उज्वल भविष्यकाळासाठी गुंतवणूकीकरीता सातारा शहर व परिसर हा भाग गुंतवणूकदारांना पर्वणीच ठरणार आहे.“रचना २०२४” हे प्रदर्शन म्हणजे केवळ इमारतीची खरेदी-विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटेरिअर डिझाईन मटेरिअल, मार्केटमध्ये येणारे नव- नवीन तंत्रज्ञान, प्लंबिंग, किचन, गार्डन्स याकरीता लागणाऱ्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांची एकाच ठिकाणी मिळण्याची केलेली ही परिपूर्ण व्यवस्थाच आहे. नवीन सरकारी धोरणांनुसार बँकेकडे जमा होणारे भरपूर भांडवल हे कमीतकमी व्याजदराने खरेदीदारांना पुरविले जाणार आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत जास्त वाटणारेव्याजदरही हळूहळू कमी होणार आहेत. “रचना २०२४” या वास्तू प्रदर्शनात अनेकबांधकाम व्यावसायिक अनेक आकर्षक योजनांसह सहभाग घेणार आहेत. त्यामुळे घर घ्यावयाची हिच योग्य वेळ आहे.

सेक्रेटरी हर्षद वालावलकर म्हणाले, ‘रचना २०२४’ या प्रदर्शनामध्ये सुमारे १०० स्टॉल्स उभारले जाणार असून, बिल्डर्स प्रोजेक्टस्, किचन इक्विपमेंन्टस्, इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज्, इनोव्हेटीव्ह बिल्डींग मटेरिअल्स, स्विमिंग पुलस्, गार्डन, फिटनेस इक्विपमेंन्टस् अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल. ‘रचना २०२४’ हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक होण्यासाठी सातारा सेंटरचे सर्वच सभासद अतिशय मेहनत घेत आहेत. सातारा जिल्हा परिषद ग्राऊंड येथे हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. सातारा शहर तालुका व जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व क्षेत्रांतून ४ दिवसात ३ लाखांपेक्षा जास्त लोकं याठिकाणी येऊन सदर प्रदर्शनास भेट देत असतात व यापुढेही देतील.असा आयोजक समितीचा अंदाज असून, करोडो रूपयांची उलाढाल या प्रदर्शनातून होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ना नफा, ना तोटा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातारा सेंटर तर्फे हे प्रदर्शन आयोजित केले जात असते. सर्व सभासद प्रसंगी स्वत:ची कामे बाजुला ठेवून या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन या व्यवसायास ऊर्जीतावस्था येण्याकरीता व खरेदीदारांना आपल्या पैशांचा पुरेपुर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात.

‘रचना २०२४’ मध्ये स्टॉल्स बुकिंगसाठी संपर्क श्री. निलेश पाटील मोबाईल नंबर ८६००४३३९०९ व श्री. मंगेश लावंड मोबईल नंबर ९८२३८८७७७६ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन सातारा सेंटर तर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!