सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या अन्याया बद्दल गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर पारधी समाजाच्या वतीने अचानक राडा घातला. त्यामुळे ट्राफिक पोलिसांसह सातारा पोलिसांची तारांबळ उडली.
सातारा पवई नाका अचानक मोठा जमाव जमवून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरासमोर घोषणाबाजी झाल्याने सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे. अर्थ संकल्पिय अधिवेशन सुरू असताना राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील दौलत बंगल्यासमोर मोठा जमाव जमवून गदारोळ नेमका काय झाला यामुळे सातारा जिल्हा पोलीस दल तारांबळ झाली असून मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर आलेला आहे नेमका प्रकार काय आहे याच्या संदर्भात नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
You must be logged in to post a comment.