राहुल पवार यांचे उपक्रम कौतुकास्पद : राजेंद्र चोरगे

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलास स्मशानभूमीस देणगी

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी सामाजिक बांधिलकीतून राबवलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत,’ असे मत श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील कैलास स्मशानभूमीस ११ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. शिवाय वृक्षारोपण, भिक्षेकरी गृहास धान्य वाटप, एहेसास मतिमंद मुलांच्या वसतिगृहास धान्य वाटप आदी सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले.

यावेळी राहुल पवार यांच्यासह भरत रावळ, अझहर शेख दिलीप मामा सोडमिसे, वैभव वेळापुरे, चैतन्य जोशी, अविनाश भोसले, अर्जुन शिंदे, गणेश पवार, अनिकेत साळुंखे, सागर पवार तसेच इतर पदाधिकारी व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्या वाढदिवशी मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी सातारा शहर मनसेतर्फे रक्तदान शिबिर, धान्य वाटप, सामाजिक संस्थांना आर्थिक मदत आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाबद्दल मनसेच्या पक्षश्रेष्ठींकडूनही समाधान व्यक्त होत असते.
error: Content is protected !!