लोणंद, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : लोणंद रेल्वे स्टेशन नजीक आश्विनी हॉस्पिटलच्या दिशेला रविवारी सांयकाळी बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस गाडी नंबर ०६५०६ या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरी ता. खंडाळा येथील एस आर पी मध्ये कार्यरत असणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा व त्याच्या एक वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.
या घटनेची नोंद सातारा रेल्वे पोलीस स्टेशनला करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते.
या घटनेबाबत रेल्वे माहिती अशी की, अंदोरी ता खंडाळा शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय २८ ) हा तरुण धुळे येथे एसआरपीमध्ये कार्यरत होता. तर त्यांची पत्नी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. शैलेश बोडके हा सुट्टी घेऊन दोन दिवसापुर्वी अंदोरी येथे घरी आला होता, शैलेश बोडके हा त्यांच्या रुद्र बोडके या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेला असताना बेंगलोर जोधपुर एक्सप्रेस गाडी नंबर ०६५०६ या रेल्वेच्या धडकेमध्ये शैलेश बोडके वय २८ व त्यांच्या एका वर्षाच्या रुद्र बोडके या मुलाचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.
या घटनेनंतर सातारा रेल्वे पोलीस व्ही आर पाटोळे, पी एन भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते. रेल्वे पोलीसांनी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात या बापलेकाचे शवविच्छेदन करुन मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईच्या ताब्यात दिला आहे.
You must be logged in to post a comment.