सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माण तालुक्यातील पळशी, गोंदवले, राणंद, मार्डी, देवापूर, बिदाल, दहिवडी, वडगांव, शेवरी परिसरात पावसाने विजांचा कडकडाटासह हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी दैना झाली. उन्हाळी मका, कडवळ पिके भुईसपाट झाले. शिरतावमध्ये वीज पडल्याने दहा शेळ्यांचा मृत्यू झाला.
डाळींब पिकाची फुलकळी गळाली असून आंब्याच्या बागेलाही तडाखा बसला आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा असल्याने झाडे पडण्याचे घटना घडल्या आहेत. बिदाल परिसरात उन्हाळी कांद्याचे तयार पिकाच्या ऐरणीवरील कागद उडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता.
शिरताव येथील दगडू नामदेव लुबाळ यांच्या दहा शेळ्या व एक बोकड वीज पडून जागीच ठार झाला. घटनास्थळी पाऊस उघडल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र काही अंशी दिलासाही मिळाला आहे. सकाळपासूनच हवेत उखाडा होता दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली त्यानंतर हवेत गारवा जाणवत होता.
You must be logged in to post a comment.