सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : राज्यभरातील भोंग्यांसदर्भात राज ठाकरे यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. आपण स्वतः वेळप्रसंगी गुन्हा दाखल करू, असा इशारा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शासकीय विश्रामगृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. श्री. माने म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जातींचा अभ्यास करून भारतीय संविधान तयार केलं असून, ते सर्वोच्च आहे. त्या संविधानावर आक्रमण करून भाजपनं देशभरात धुडगूस घातला आहे. याचबरोबर राज्य शासनाला मशिदीवरील भोंग्या संदर्भात अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे? घटनेनं सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलं आहे.
You must be logged in to post a comment.