सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला.
यावेळी राज्यचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
श्री. भोसले यांच्यासमवेत जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकारी युवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्यावर रणजितसिंह भोसले नाराज असल्याची चर्चा होती.
आज त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रणजितसिंह भोसले यांचा सत्कार करण्यात्र आला. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख संभाजीराव पाटील, माथाडीचे जिल्हा प्रमुख प्रशांत शिंदे या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार व सात उपजिल्हा प्रमुख व १५ तालुका प्रमुख समवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.