फलटणच्या राजू बोके टोळीवर मोक्का कारवाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महामार्ग व जिल्ह्यातील निर्मनुष्य ठिकाणी वाहने अडवून प्रवाशांकडून सोने, रोख रक्कम लुटणारी फलटणमधील राजू बोके व त्याच्या साथीदारांच्या टोळीवर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल यांनी मोक्का कारवाई केली आहे.

सातारा जिल्ह्यातील निर्मनुष्य ठिकाणांवर लक्ष ठेवून महामार्ग व इतर जोडरस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवाशी, दुचाकी स्वार व महिला प्रवाशी, जोडपे यांच्यावर लक्ष ठेवुन वाहनांचा पाठलाग करुन त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने, मोबाईल हॅण्डसेट, रोख रक्‍कम असा ऐवज राजू बोके याची टोळी लुटत होती. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

या टोळीतील आरोपींनी संघटितपणे, आर्थिक फायद्याकरीता सातारा, सोलापूर ब पुणे जिल्हयातील महामार्ग व इतर जोडरस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवाशी, दुचाकी स्वार व महिला प्रवाशी, जोडपे,व्यापारी यांच्यावर लक्ष ठेवुन वाहनांचा पाठलाग करुन त्यांच्या जवळील सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल हॅण्डसेट, रोख रक्‍कम असा ऐवज वेगवेगळया घातक हत्यारांचा धाक दाखवुन, त्यांना मारहाण करुन दरोडे, गंभीर दुखापतीसह जबरी चोरी, चोरी दुखापत अशा प्रकारचे गुन्हे असे करीत
असल्याचे निष्पन्न झाले म्हणून श्री. बी.के किंद्रे,पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण १९९९ अन्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या मार्फतीने मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला, या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली असून या गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहेत.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्ह्यात कार्यभार स्विकारल्यापासून सन २०२० मध्ये २ व सन २०२१ मध्ये आजपर्यंत ८ असे एकुण १० संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधिल ५८ इसमांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये ४१ इसमांना हद्दपार केले आहे.

error: Content is protected !!