चौपाटी गांधी मैदानावर नव्हे तर आळूचा खड्डा परिसरात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून राजवाडा येथील गांधी मैदानावरील चौपाटी बंद असल्याने तेथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शुक्रवारी या व्यावसायिकांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चौपाटी सुरु करण्याची मागणी केली. यावर उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरुपात चौपाटी गांधी मैदानाएवजी आळूचा खड्डा परिसरातील वाहनतळाच्या जागेवर भरवण्यात येणार आहे.

टाळेबंदीनंतर अनेक व्यवसाय टप्प्याटप्याने सुरु करण्यात आली. सर्व हॉटेल रेस्टॉरंट सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, अद्यापही राजवाडा येथील चौपाटी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे येथील १०० व्यावसायिक व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना रोजगार नसल्याने उपसामारीची वेळ आली आहे. यावर येथील व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन चौपाटी सुरू करण्याची मागणी केली. परंतु अद्यापही चौपाटी सुरु झाली नाही.

दरम्यान,या व्यावसायिकांनी शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांची जलमंदीर या निवासस्थानी भेट घेतली. आपल्या मागण्या मांडल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी तातडीने आळूचा खड्डा परिसरात चौपाटी सुरू करण्याच्या सूचना केल्या. नगरपालिका प्रशासनानेही तातडीने या परिसरातील जागांचे लाटरी पध्दतीने वाटप केले.  यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक डी. जी. बनकर, बाळासाहेब ढेकणे, नगरपालिकेचे प्रशांत निकम व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!