सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मागील आठवड्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार तब्बल ११ महिन्यांनंतर राजवाड्यावरील चौपाटी सुरू करण्यात आली होती. पण, शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने सातारा पालिकेने राजवाडा चौपाटी बंद करण्याचा आदेश काढला आहे.
सातारा शहरात तब्बल साठ व्यापारी करोना बाधित झाल्याचे समजताच पालिकेची आरोग्य यंत्रणा तातडीने सतर्क झाली. पालिकेत नगराध्यक्ष माधवी कदम, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, कोविड कक्ष प्रमुख प्रणव पवार, आरोग्य विभाग प्रमुख सुहास पवार, उपस्थितीत आरोग्य विभागाची शुक्रवारी नगराध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. यावेळी वाढत्या करोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी संभाव्य उपाययोजनांचा आढावा घेतला.
चौपाटीवरील पाच विक्रेते पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्ताला मुख्य़ाधिकाऱ्यांनी दुजोरा देत तत्काळ चौपाटी बंद ठेवण्याचे आदेश शहर विकास विभागाला दिले. जोपर्यंत चौपाटीवरील सर्व विक्रेत्यांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत नाहीत तोपर्यंत चौपाटी बंद राहणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.