सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रामाची नियत खराब होती. जयकुमारची नियत खराब नाही. त्यामुळे मी जिंकलो, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
सातेवाडी, ता.खटाव येथील १ कोटी १० लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, गोपिचंद पडळकर उपस्थित होते.
माण तालुका बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार जयकुमार गोरे यांनी रामायणातील कथेचे उदाहरण देत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर टिका केली. दरम्यान, श्रोत्यांनी आमदार जयकुमार गोरे यांना वक्तव्य चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी चूक दुरुस्त करत रावणाची नियत खराब होती, असे वक्तव्य केले.
You must be logged in to post a comment.