सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अतिवृष्टीत सातारा जिल्ह्यातील ४१६ गावे बाधित झाली आहेत. ४० हून अधिक लोकांची जीव गेला आहे. तर काहीजण बेपत्ता आहेत. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर केंद्राने २ लाख देण्याचे जाहीर केले आहे. आमची मागणी अशी आहे की, जखमी असणाºयांनाही ५० हजारांची मदत देण्यात यावी. तसेच दरडीचा धोका असणाºया गावांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावं, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.
अतिवृष्टीमुळे वाई तालुक्यात भूस्खलन झालेल्या देवरुखवाडी, कोंढावळे गावाला रामदास आठवले यांनी भेट दिली. त्यानंतर सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आप्पा तुपे आदी उपस्थित होते.
रामदास आठवले यांनी देवरुख वाडीतील भूस्खलन भागाची व जांभळीतील वाहून गेलेल्या भातशेती व पुलाची पहाणी केली, तसेच यावेळी जांभळी खोर्यातील नागरिकांनी १००% टक्के पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी ना.आठवले यांना दिले.
राज्यात अतिवृष्टीने १०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भूस्खलनाच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे दरडींचा धोका असणाºया गावांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावं. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प कार्यक्रमही राज्याने हाती घ्यावा,’ अशी आग्रही मागणीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
You must be logged in to post a comment.