सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): भीमनगर दरे येथील कोयना प्रकल्पग्रस्त गावाची शेत जमीन रेल्वे प्रशासनाने जबरदस्तीने विकास कामांसाठी स्वतःच्या कब्जात घेतली आहे आणि शेतकऱ्यांना भूमीहीन केले आहे ही जमीन तत्काळ परत करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसमवेत उपोषण सुरू केले आहे.
शेतकऱ्यांना तत्काळ न्याय मिळावा अन्यथा आमरण उपोषणाद्वारे आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा यावेळी उबाळे यांचेकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.या प्रकल्पग्रस्तांच्या यादीमध्ये सुमारे ३५ हून अधिक शेतकरी असून यांच्या जमिनी रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत.रेल्वे अधिकारी एस.एस.टेंभेकर व प्रांताधिकारी कार्यालय कोरेगाव यांच्या संगनमताने हे सर्व प्रकार घडत आहेत.
या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची कोणतीही दाद घेतली जात नाहीत त्यामुळे तत्काळ या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा रमेश उबाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
You must be logged in to post a comment.