रामराजे रुग्णालयात दाखल


सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यात जिल्हा बँकेच्या निवडणूकीची खलबत चालू असतानाच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

मुत्रसंसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत असताना तिथूनच सातारा जिल्हा बँके सहकार पॅनलचे उमेदवार पत्रकारांसमोर जाहीर केले. 

आमदार मकरंद पाटील यांनी रामराजेंशी मोबाईलवरुन संपर्क साधला. व्हिडीओ कॉलद्वारे रामराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. रामराजे म्हणाले, राष्ट्रवादीपुरस्कृत पॅनलचे नाव हे सहकार पॅनल असून त्याचे चिन्ह कपबशी असेल. यावेळी रामराजेंनी पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची नावे पत्रकारांसमोर जाहीर केली. बिनविरोध ११ उमेदवार वगळता. शशिकांत शिंदे (जावली सोसायटी), बाळासाहेब पाटील (कऱ्हाड सोसायटी), सत्यजित पाटणकर (पाटण सोसायटी), नंदकुमार मोरे (खटाव सोसायटी), मनोज पोळ (माण सोसायटी), ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे (महिला प्रतिनिधी), प्रदीप विधाते (इतर मागास प्रवर्ग), रामराव लेंभे (नागरी बँका) यांना सहकार पॅनलतर्फे अधिकृत उमेदवारी दिली आहे, असे रामराजेंनी सांगितले.

error: Content is protected !!