सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुढच्यावेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त करून खळबळ उडवली.
फलटण येथे काल रात्री तालुका व शहर भाजप कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर तसेच अनुप शहा आदी उपस्थित होते.
यावेळी भाषण करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुढच्यावेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत. या विधानामुळे आता भाजपला उदयनराजेही नको आहेत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
You must be logged in to post a comment.