सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावळी तालुक्यामध्ये गेल्या काही आठवड्यात एका शाळकरी मुलीवर तिच्या वर्गमित्रांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना माण तालुक्यामध्येही सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावासह दोघांनी अत्याचार केला असून, यातून संबंधित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माण तालुक्यातील एका गावातील मुलगी सातवीमध्ये शिकत आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाने तिला धमकी देउन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तर पीडित मुलीच्या पंधरा वर्षांच्या चुलत भावाने तुमचे लफडे मला माहित आहे. मी इतरांना सांगेन, असे म्हणून ब्लंकमेल करून बहिणीवर वारंवार अत्याचार केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर मुलीला याबाबत विचारल्यानंतर तिने या घृणास्पद प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. आईने तत्काळ दहिवडी पोलिसांना याची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी तत्काळ संबंधित दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. यातील एक मुलगा १९ वर्षांचा आहे.
You must be logged in to post a comment.