सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील पती आणि सासूचा विश्वास संपादन करून २२ वर्षाच्या महिलेला वाई शहरातील एका अपॉर्टमेंटमध्ये आणून तिला डांबून मारहाण करत अत्याचार करण्यात आला. त्यामुळे वाई शहरासह तालुक्यात खळबळ उडली आहे.
याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, मुंबई येथील एका २२ वर्षीय महिलेच्या पतीची आणि सासूची एका व्यक्तीची ओळख होती. त्या व्यक्तीने तिच्या सासऱ्याच्या गावी मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध मिळते. अशी बतावणी करून त्या महिलेला वाईमध्ये आणले. वाई शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आणून एका खोलीत कोंडून ठेवले. तसेच मारहाण करत अत्याचार केला. त्यानंतर त्याने चुलत्याच्या गावी यवतमाळ येथे घेऊन जाऊन तेथेही मारहाण करून जबरदस्तीने त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. याची माहिती कोणास दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाविरुद्ध संबंधित महिलेने कुर्ला मुंबई येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेथून ही तक्रार वाई पोलीस ठाण्यात आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा झाला असून, याचा तपास वाई पोलीस करत आहेत
You must be logged in to post a comment.