जावलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावली तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय मुलीवर चार जणांनी मागील वर्षभरापासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, सहा वर्षीय अल्पवयीन मुलाला खेळण्याचा व खाऊ देण्याचा बहाणा करून तिच्यावर अत्याचार करत होते. हा प्रकार मागील वर्षभरापासून सुरू होता. याप्रकरणी रामचंद्र कोंडीबा सुतार, लक्ष्मण कोंडीबा सुतार, अनिकेत रामचंद्र सुतार साहिल राजू ओंबळे, अनिकेत राजू ओंबळे व रवींद्र विश्वनाथ ओंबळे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेढा पोलिसांनी चौघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.

error: Content is protected !!