मोठे मताधिक्य देण्याचा पंडीत राठोड यांचा शब्द
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेने महायुतीला जाहीर पाठींबा दिला. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद प्रयत्न करेल, असा विश्वास राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.पंडीत राठोड यांनी व्यक्त केला.
समाजातर्फे उदयनराजे भोसले यांना भेटून जाहीर पाठिंबा दिला आहे. सातारा जिल्ह्यात बंजारा समाजाचे ५० हजारहून अधिक मतदार असून राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पाठींब्यामुळे उदयनराजे यांचा विजय निश्चित होईल याची खात्री मानली जात आहे.यावेळी ॲड.पंडीत राठोड, अनिल नाईक यांनी उदयनराजेना पाठिंब्याचे पत्र देऊन सन्मान केला.
यावेळी उदयनराजे म्हणाले, मी बंजारा समाजाच्या सोबत असून गोर बोली भाषेला मान्यता प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन.गोर बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या समिती स्थापन करू,स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्थान मिळवून देऊ तसेच तांड्या मध्ये विकासाची गंगा पोहचवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषदची मोठी ताकत आहे. सातारा जिल्ह्यात बंजारोकी ललकार.. इस बार भी मोदी सरकार..अब की बार ४०० पार.. में बंजारा मोदी हमारा.. हा नारा देऊन महाराष्ट्र दौरा करून ॲड. पंडीतभाऊ राठोड यांनी महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी ताकतीने काम करत आहेत.
या वेळी प्रदेश प्रवक्ता अमोल पवार, कार्याध्यक्ष अनिल नाईक,ग्रामपंचायत सदस्य नामदेव राठोड, धर्मराज राठोड, शिवाजी राठोड, मोहन राठोड, नाना राठोड, सुनील चव्हाण, संदीप राठोड यांच्या सह सातारा लोकसभा मतदार संघातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.