रेशन कार्ड आधार लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासून धान्य बंद

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व कार्डधारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक आहे. रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास  येत्या १ फेब्रुवारीपासून रेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा कसवे व तहसीलदार आशा होळकर यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक शंभर टक्के लिंक करण्याच्या सुचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यात ५ लाख ३० हजार एवढे लाभार्थी आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आर्थिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल लिकिंग सुधारणे आवश्यक आहे. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार लिंकिंग व किमान एक वैध मोबील क्रमांक लिंक करण्याच्या उदिष्ट्याने सातारा जिल्ह्यातील सर्व मंडलावर काम सुरू आहे.

error: Content is protected !!