दूध दरवाढ प्रश्नी रयत क्रांती संघटना आक्रमक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खाजगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रति लिटर 10 ते 18 रुपयांनी पाडले असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. लॉकडाऊन पूर्वी शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी 30 ते 38 रुपये दर मिळत होता. लॉकडाऊन जाहीर होताच टप्प्याटप्प्याने हे दर संघटितरीत्या पाडण्यात आले असून ते 20 ते 22 रुपये प्रति लिटर वर आणण्यात आले आहेत. यावरुन रयत क्रांती संघटनेने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

रयत क्रांती संघटनेने आज कार्यकर्त्यांसह जळगाव येथे रयत क्रांती सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाईच्या दुधाला १८ ते २० रुपये पर्यंत प्रति लिटर भाव मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार ३/५ फॅट व ८/5 एसएनएफ नुसार किमान २५ रुपये प्रति लिटर दर देणे आवश्यक आहे, परंतु या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्थाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्था व खाजगी कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्याचे काम दूग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकंच नाही तर खाजगी दूध संस्थावर व खाजगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत FRP आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे. ऊसासाठी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ७०/३० चा फ्लॅर्मुला आहे त्याप्रमाणे दुध उत्पादकांसाठी किमान ८५/१५ चा फ्लॅर्मुला करणे गरजेचे आहे. सध्या कोल्हापूर मधील गोकtळ दूध संघामध्ये ८१/१९ चा फॉर्मुलाकार्यरत आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दtध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दtध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे. या सर्व मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

error: Content is protected !!