रयत क्रांती संघटनेचा कराडात ट्रॅक्टर मोर्चा

कराड, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल ही एकरकमी द्यावी या मागणीसाठी आज रयत क्रांती संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.

किरकोळ बाजारात साखरेचा दर ३५ ते ३८ रुपये किलो असून ऊसापासून मळी, बगँस, मॉलिसेस, अल्कोहोल, वीजनिर्मिती व इथेनॉल असे उपपदार्थ तयार होतात त्यातून साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळते. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ऊसाची रिकव्हरी पाहता साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला ३३०० रुपये प्रतिटन दर दिला पाहिजे व अन्य मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार सदाभाऊ खोत, सचिन नलवडे, सागर खोत, प्रा.मचिंद्र सकटे, शंकर शिंदे, मधुकर जाधव, प्रकाश साबळे, लालासाहेब पाटील, विनायक जाधव, अशोक लोहार विठ्ठल विरकर, लालासो धुमाळ, मुसद्दीक आंबेकरी, योगेश झांबरे व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!