कर्मवीर समाधी परिसर लक्ष दिव्यांनी उजळला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी परिसर सोमवारी सकाळी लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता.

दिवाळीच्या सणाच्या निमित्त सोमवारी वसुबारसेच्या पहाटेला रयत शिक्षण संस्थेच्या भीमाबाई आंबेडकर कन्या विद्या मंदिर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कर्मवीर समाधी परिसरात दिपोत्सव करण्यात आला.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्रि.डॉ. विठ्ठलराव शिवणकर, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, विभागीय अधिकारी आर. एस. साळुंखे, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका एस. एस.जंगम, सौ सुनिता मोहन पाटील, सौ सुनंदा अजित पाटील, डॉ मीनाक्षी पाटील, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किरण देवकर, सौ प्रतिभा पाटील, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर मधील सर्व शिक्षक. विद्यार्थिनी आणि सेवक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!