रयत विद्यापीठास राज्य शासनाची मान्यता

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने, समूह विद्यापीठ निर्माण करणे शक्‍य व्हावे, यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यभरातील उत्व शैक्षणिक संस्था अंतरनिहाय विखुरण्यामधील मोठी तफावत दूर करण्याकरिता समूह विद्यापाठे स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे. ज्या ‘महाविद्याळयांकडे पुरेशा शैक्षणिक, भोतिक व तांत्रिक पायाभूत सोयीसुविधा आहेत. अशा ३ ते ५ विद्यमान महाविद्यालयांची संसाधने एकत्रित करून ही विद्यापीठे निर्माण करण्याकरिता, विद्यापीाचे विविध दर्जात्मक मापदंड मोठ्या प्रमाणात दर्शवून गणाच्या दर्जा राखण्यात समर्थ असलेल्या महाविद्यालयांचा समावेश करण्यात येईल.

राष्ट्रीय उच्वतर शिक्षा अभियानाअंतर्गत यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था, सातारा (स्वायत्त) हे. मुख्य महाविद्यालय व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) ही दोन सहभागी महाविद्यालये या तीन अनुदानित महाविद्यालयांचा समावेश असलेले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ मान्यता देण्यात आली.

error: Content is protected !!