सातारा नगरपरिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाचे १० कोटी प्राप्त

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषदेने १ रुपया नाममात्र किंमतीमध्ये उपलब्ध करुन घेतलेल्या ४० गुंठे जागेमध्ये, ९ मजली प्रशासकीय इमारत उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन सुमारे ६० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला दिला होता. त्यानुसार शासनाच्या ९० टक्के हिश्यापैकी, रुपये १० कोटींचा पहिला हप्ता शासनाने नुकताच उपलब्ध करुन दिला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यालयातून आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

सातारा नगरपरिषदेनेही अंदाजपत्रकात गतवर्षी आणि या वर्षी भरीव तरतुद केली असल्याने, आता या कामाची निविदा प्रक्रीया सुरु करून, कामाला सुरुवात करण्यात येईल. नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले आहे.
ज्या ठिकाणावरुन सातारा शहरातील नागरीकांच्या विकासाची, सुरक्षित वाहतुकीची आणि जन्मापासून अखेर पर्यंत विविध निकडींची समाजउपयोगी कामे होत असतात, नगरपरिषदेची विद्यमान कार्यालय इमारत अपुरी पडणार वस्तुस्थिती लक्षात घेवून प्रशासकीय इमारतीकरीता सातारा विकास आघाडीने प्रथम, नरेंद्र दाभोळकर पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्व पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांचेकडुन जिल्हापरिषदेच्या इमारती जवळील सुमारे ४० गुंठे जागा, सातारा नगरपरिषदेकडे नाममात्र एक रुपयामध्ये हस्तांतरीत करून उपलब्ध करून घेतली.

त्यानंतर सदर जागेवर अत्याधुनिक वैशिष्ट्ये असलेली ९ मजल्याची इमारत उभारणेकरीता, सातारा विकास आघाडीने नगरपरिषदेच्या माध्यमातुन सुमारे ६० कोटींचे अंदाजपत्रक आणि स्पर्धात्मक प्राप्त झालेले आराखडे तयार केले. सदरचा प्रस्ताव वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधुन शासनाकडे निधी उपलब्ध होण्याकरीता ना.एकनाथ शिंदे यांना आम्ही समक्ष भेट घेवून, विस्तृत चर्चा करून दिला होता. त्यानुसार राज्यशासनाने १० कोटींचा पहिला हप्ता वितरीत केला आहे. हद्दवाढ झालेल्या भागासह सातारा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जागेत नगरपरिषदेची सुसज्य अशी मुख्य प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. सुसज्य विविध पदाधिकारी दालने, कॉन्फरन्स हॉल, व्हि.सी. हॉल, नगरपरिषदेचे अद्यावत सभागृह, विश्रांतीगृह, कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी उपहारगृह, अभ्यागतांसाठी अभ्यागत कक्ष, यासह विविध सुविधा सह बहुमजली इमारत उभी करण्यात येणार आहे.

आता वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधुन शासनाने ९० टक्के खर्च उचलला आहे. त्याचा पहिला हप्ता असलेल्या रुपये १० कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेस वितरीत करण्यात आला आहे. लवकरच याबाबतची निविदा प्रक्रीया राबविली जावून, मुख्य इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली जाईल. राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे याकामी भरीव सहकार्य लाभले आहे.

error: Content is protected !!