वाईसह सातारा, पाचवड, पाचगणी, कराड व शिरवळ येथे रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाई,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘वाई फेस्टिवल २०२४’ अंतर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सातारा जिल्ह्यात एकूण ६७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीतून उत्कर्ष पतपेढीच्या पुढाकारातून होत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.वाई फेस्टिवलच्या माध्यमातून गेले १६ वर्ष अविरतपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम केवळ वाईपुरता मर्यादित न ठेवता सातारा, पाचवड, पाचगणी, कराड व शिरवळ येथेही विस्तारित करण्यात आला आहे. उत्कर्ष पतसंस्थेच्या शाखा असलेल्या अन्य शहरांमध्येही आयोजित रक्तदान शिबीरांस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वाईमध्ये गणपती घाटावरील काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात आयोजित केलेल्या शिबिरात २०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता, रक्तदान उपक्रमाची जनजागृती समाजात वाढत असल्याचे दिसून येत आहे. महागणपती घाटावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांनीदेखील या उपक्रमात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उ्दघाटन वाईतील बाल रोगतज्ञ डॉ.लक्ष्मण कदम यांनी केले.
या फेस्टिवलची ख्याती ऐकून सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष शंकरसा गुजराती, उपाध्यक्ष उदयसा जहागीरदार, सचिव रमाकांत वाळवेकर, अरविंद कलबुर्गी, केशव क्षत्रिय, सुनीला क्षत्रिय आधी आधी पदाधिकाऱ्यांनी वाई येथे या उपक्रमास भेट दिली. तसेच उदयसा जहागीरदार यांनी उत्स्फूर्तपणे स्वतः रक्तदानदेखील केले.
पाचवड येथे पाचवड व्यापारी संघटना व तिरंगा एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने झालेल्या शिबिरात १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पाचवडमधील शिबिराचे उद्घाटन अनिल क्षीरसागर (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,वाई), पाचवडचे सरपंच महेश गायकवाड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जीवन शेवाळे, तिरंगा एज्युकेशन सोसायटीचे सचिव जयवंत पवार, संस्थेचे हितचिंतक जेष्ठ सभासद बाळकृष्ण वाघ यांनी केले.
पांचगणी येथेही ५२ जणांनी रक्तदान केले. तेथील शिबिराचे उद्घाटन अमोल बिरामणे, अंकुश मालुसरे, नामदेव चोपडे, प्रसाद कारंजकर, सुभाष मोरे, यशवंत पार्टे, आकाश बागडे तसेच कृष्णाई मंडळ भीमनगर- पांचगणी यांच्या उपस्थितीत झाले.
सातारा येथे ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून या शिबिराचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष जयवंतदादा भोसले, सुप्रसिद्ध सराफी व्यापारी चंदन घोडके, पंकजशेठ ओतारी, जय जवान जय किसान गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष दादा गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.
कराड येथे ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तेथील शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पीएसआय रेखा देशपांडे, सविता मोहिते, सराफी व्यापारी विश्वास शिंदे, गणेश ओवे, भूषण थोरात व सुभाष शिंदे, समीर जोशी, माजी सैनिक सुरेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान शिरवळ येथे भोईराज गणेश मंडळ, शिरवळ यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण २१६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याचे उद्घाटन माजी सभापती गुरुदेव बरदाडे, राजेंद्रआण्णा तांबे, सरपंच रविराज मधुकर दुधगावकर, उपसरपंच ताहेरभाई काझी, ज्ञानसंवर्धनी शिक्षण संस्थेचे संचालक ईश्वर जोशी, भोईराज गणेश मंडळाचे मयूर कराळे, अमित कांबळे, अजय चौथे, सचिन पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाई फेस्टिवल अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरास साताऱ्यातील बालाजी ब्लड बँक व माउली ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरास वाईकर नागरिक, पर्यटक व सातारा जिल्ह्यातील ठिकठिकाणी रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल फेस्टिवलचे अध्यक्ष शरद चव्हाण, कोषाध्यक्ष ॲड. रमेश यादव, सचिव सुनील शिंदे, निमंत्रक अमर कोल्हापुरे यांनी आभार व्यक्त केले.
फेस्टिवलच्या उपक्रमावेळी उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, समिती सदस्य डॉ. मंगला अहिवळे, मदन साळवेकर , श्रीकांत शिंदे, सलीमभाई बागवान, संजय वाईकर, सागर मुळे, वैभव फुले, भूषण तारू, शैलेंद्र गोखले, अमीर बागुल, नितीन वाघचौडे, सौ. प्रीती कोल्हापुरे, तुकाराम जेधे, श्रीमती नीला कुलकर्णी, श्रीमती अलका घाडगे, प्रशांत मांढरे, प्रणव गुजर, परवेज लाड, निखील चव्हाण, नितीन शिंदे, उत्कर्ष पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार, शाखा व्यवस्थापक मितेश मोरे, प्रशांत सोनावणे, साजिद मुल्ला, अक्षय मराठे, निरंजन गोळे, राजेश जायगुडे, हरिदास पवार, वसुली अधिकारी आनंद पवार, उदय घाडगे, राजेश जगताप व इतर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.