सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्रात प्रथमच लाल आणि हिरव्या भाताची लागवड महाबळेश्वरमध्ये करण्यात आली आहे. यापूर्वी निळा भात व केशर चा अभिनव उपक्रम महाबळेश्वरमध्ये करण्यात आला होता. कृषी विभागाच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाल्यानंतर आता महाबळेश्वरमध्ये लाल आणि हिरव्या भाताची लागवड करण्यात आली आहे.
कृषी विभागाचा हा प्रयोग क्रांतीपूर्वक मानला जात आहे
बिरवाडी येथील शेतकरी समीर चव्हाण यांच्या शेतात एस.आर.टी म्हणजेच सगुणा भात तंत्रज्ञान या पद्धतीने गादी वाफ्यावर या भाताची लागवड करण्यात आली. भात हे सर्वसामान्यांचे मुख्य अन्न मानलं जातं. भात म्हटले की आपल्या डोळ्यासमोर फक्त पांढरा रंग येतो. परंतु मागील आठवड्यातच महाबळेश्वर तालुक्यातमध्ये निळ्या भाताची लागवड करण्यात आली होती. याचबरोबर आता हिरवा व लाल भाताची ही लागवड करण्यात आली आहे.
शेतकरी समीर चव्हाण यांच्या शेतात भात लागवडीचं प्रात्यक्षिक देताना कृषी विभागाचे अधिकारी
ही लागवड करत असताना शेतकरी वर्गाला कृषीविभागाचे मार्गदर्शन लाभलं. यावेळी सातारा कृषी उपसंचालक विजय राऊत, अन्य महत्वाचे अधिकारी आणि शेतकरी वर्ग उपस्थित होता. जाणून घ्या काय आहेत हिरव्या भाताची वैशिष्ट्य –
- भातामध्ये ९६ टक्के फायबर,फॅट फ्री भात तसेच
- ॲंटीऑक्सीडेंटस,न्युट्रीयन्टस व व्हीटामिन्स विपुल प्रमाणात आढळतात.
या भातामध्ये फायबर,आर्यन ,मॅंगेनीजचे प्रमाण जास्त आहे तसेच मुबलक प्रमाणातील आर्यन व व्हीटॅमिन्स मुळे रक्तातील लाल पेशींची संख्खा वाढण्यास मदत होते.या भातामध्ये ब्राऊन भातापेक्षा १० पट जास्त अँटीऑक्सीटेंडचे प्रमाण आहे.
या ग्रीन राईस बद्दल माहिती देताना कृषि सहाय्यक दिपक बोर्डे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रामध्ये प्रथमच हिरव्या भाताची लागवड होत आहे. ‘तिलकस्तुरी’ हे हिरव्या भाताचे वाण असुन ते १४० दिवसांमध्ये तयार होते. या भात पिकाची वाढ १२५ सेंटीमीटर पर्यंत होते. तसेच वनस्पतींच्या पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रव्यामुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. हेच पानांमध्ये असणारे हरितद्रव्य भातांच्या दाण्यांमध्ये आढळते. त्यामुळे भाताचे दाणे हिरवे दिसतात. त्यामुळे याला हिरवा भात किंवा ग्रीन राईस म्हटले जाते. तसेच रेड राईस लाल भारताबद्दल माहिती देताना सांगण्यात आले की ११० दिवसाचे लाल भाताचे वाण असून यामध्ये ॲन्योसायनीनचे प्रमाण अत्यंत कमी आहे.त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.”
You must be logged in to post a comment.