सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा)- फलटण शहरामध्ये रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना काल (दिनांक 9 रोजी) फलटण शहर पोलिसांनी सापळा रचित अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून आज तारळे (तालुका पाटण) येथील तिघांवर व सातारा शहरातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
रवींद्र रामचंद लाहोटी,अरुण जाधव (रा. तारळे, ता. पाटण)आणि अमित विजय कुलकर्णी (रा.सातारा) अशी अटक झालेल्या संशयित तिघांची नावे असून या बाबतची अधिक माहिती अशी की फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटल मधील वार्ड बॉय सुनील विजय कचरे हा स्वतःच्या फायद्यासाठी कोविंड विषाणूच्या आजावर लागणाऱ्या रेमडीसीवर इंजेक्शनची छापील किमतीपेक्षा ज्यादा दराने म्हणजे 35 हजार रुपये किमतीने विक्री करत असल्याची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांना मिळाली होती त्यांनी सापळा रचून सुनील कचरे व त्याच्या बरोबर असणारा अजय सुरेश फडतरे यांना अन्न व औषध निरीक्षक अरुण गोडसे यांच्या सहकार्याने पकडले होते त्यांच्या चौकशीतून प्रवीण मिस्त्री उर्फ प्रवीण दिलीप साप्ते (रा. घाडगेवाडी ता. फलटण) व निखील घाडगे यांना अटक केली होती या चौघावर दिनांक 9 रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या चौघांकडे चौकशी केली असता आणखी काही नावे उघडकीस आली.
त्यामध्ये सातारा शहरातील अमित विजय कुलकर्णी (वय 45) याने सदरचे रेमडीसीवर इंजेक्शन रवींद्र रामचंद्र लाहोटी(वय 32), रा. तारळे यांच्याकडून घेतल्याचे उघडकीस आले. दोघांना पहाटे फलटण शहर पोलिसांनी पकडले असून त्यांच्या चौकशीतून तारळे येथील संशयित अजित जाधव या मेडिकलवाल्याचे व त्याच्या भावाचे नाव समोर आल्याने जाधव याला अटक करण्यात आली आहे त्याचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने अद्याप त्याला ताब्यात घेतलेले नाही. आणखी पुढे तपास सुरू असल्याची माहिती फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भरत केंद्रे यांनी दिली आहे
You must be logged in to post a comment.