समर्थ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा डोस कमी करून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. याप्रकरणात सातारा येथील समर्थ हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग निष्पन्न असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी १२ रेमडेसिव्हिरची इंजेक्शन हस्तगत केली आहेत. जिल्हा विशेष शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री प्रशांत दिनकर सावंत (वय २९) आणि सपना प्रशांत सावंत (वय २५, दोघेही रा. मंगळवार पेठ) यांना मूळ विक्री किमतीपेक्षा अधिक दर देण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेउन जाताना पकडले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत.

यादरम्यान, सौरभ प्रकाश पवार (स. खेड) याने प्रशांत सावंत व सपना सावंत यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन विक्री करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामु त्यातही अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत पवार याच्याकडून ९ इंजेक्शन्स जप्त कण्यात आली आहेत. एकूण १२ इंजेक्शन जप्त केलो आहेत. याची किंमत ३५४८० रुपये आहे. तपासात प्रशांत सावंत हा शहरातील समर्थ मंदिर परिसरातील समर्थ हॉस्पिटलमध्ये सर्जिकल वॉर्डमध्ये काम करत होता. तो दाखल असलेल्या रुग्णसाठी नातेवाईक व स्णालयांकडून’मिळाठेल्या सहा इंजेक्शनपैकी तीनइंजेक्शनची चोरो करून रुग्णाला केवळ तीनच इंजेक्शन देत होता, असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामध्ये संबंधित रूणालयातील ‘काही जण त्याला मदत करत असल्याचे निष्पत्र झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

error: Content is protected !!