राज्यस्तरीय दादा महाराज करंडक स्पर्धेत अभिनय कल्याणची जीर्णोद्धार प्रथम

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : करोनाच्या भयंकर वाईट काळानंतर मागील दोन वर्षे बंद असलेल्या सातारा नगरपालिकेची राज्यस्तरीय श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे (दादा) महाराज करंडक एकांकिका स्पर्धा मोठ्या धामधुमीत पार पडली.

सातारा नगर पालिकेच्या पुढाकाराने ही रंगयात्रा भरवली गेली होती आणि महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून २४ संघांनी या स्पर्धेला हजेरी लावली. या स्पर्धेत अभिनय कल्याणया संघाची जीर्णोद्धार एकांकिका प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. स्पर्धेत मिळालेली इतर बक्षिसे पुढीलप्रमाणे

सांघिक पारितोषिके पुढीलप्रमाणे
जीर्णोद्धार (अभिनय, कल्याण) प्रथम, जनावर (प्राण, मुंबई) द्वितीय, कुस्ती (हापूस क्रिएशन, इस्लामपूर) तृतीय, शेवट तितका गंभीर नाही (समांतर, सांगली) उत्तेजनार्थ प्रथम, कम्युनिकेशन एरर (बाराखडी प्रोडक्शन सातारा) उत्तेजनार्थ द्वितीय, लाऊड अँड क्लियर (रंगयातत्रा इचलकरंजी) उत्तेजनार्थ तृतीय
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
अभिजित झुंजारराव (जीर्णोद्धार) प्रथम, ऋषीकेश जाधव (जनावर) द्वितीय, मनोज वेटम (कुस्ती) तृतीय
सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष
शिवराम गावडे (जीर्णोद्धार) प्रथम, साई निरावडेकर (लाडाची लेक) द्वितीय, पराग फडके (लाउड आड क्लीअर) तृतीय, ऋषिकेश शिंदे (कुस्ती) उत्तेजनार्थ प्रथम, मयुरेश पाटील (शेवट तितका गंभीर नाही) उत्तेजनार्थ द्वितीय, सिद्धेश नलावडे (भगदाड) उत्तेजनार्थ तृतीय
सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री
मनाली जाधव (जीर्णोद्धार) प्रथम, रंजना सहदेव (दप्तर) द्वितीय, रविना गोगावले (बारा किलोमीटर) तृतीय, स्नेहा धडवई (कम्युनिकेशन एरर) उत्तेजनार्थ प्रथम, सुचिता गिरधर (अंत आरंभ) उत्तेजनार्थ द्वितीय, मानसी कुलकर्णी (लाउड आड क्लीअर) उत्तेजनार्थ तृतीय
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना
आकांक्ष पांचोळ (जनावर) प्रथम, शाम चव्हाण (जीर्णोद्धार) द्वितीय, इरफान मुजावर (शेवट तितका गंभीर नाही) तृतीय
सर्वोत्कृष्ट नेपथ्य
सागर (जीर्णोद्धार) प्रथम, निरंजन केसकर (दोरखंड) द्वितीय, अभिजित पवार तृतीय (कम्युनिकेशन एरर) तृतीय
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
सुरेश वाडेकर आणि संतोष डांगे (कुस्ती) प्रथम, भावेश गंभीर (भगदाड) द्वितीय, नम्रता धनावडे (सावल्या) तृतीय
सर्वोत्कृष्ट रंगभूषा वेशभूषा
प्राण मुंबई (जनावर) प्रथम, विनय गोडे (राकस) द्वितीय, ओमकार जंगले (तृतीय)
तर खास पुरस्कारांमध्ये नवीन संहिता पुरस्कार कुस्ती या एकांकिकेसाठी सत्याप्पा मोरे यांना तर बालकलाकार पुरस्कार धृवी संतोष पाटील हिला बारा किलोमीटर या एकांकिकेसाठी प्राप्त झाला.
विद्यासागर अध्यापक, उज्वला खांडेकर, राजीव मुळ्ये या मान्यवरांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धा प्रमुख म्हणून माजी नगरसेवक कल्याण राक्षे यांनी आपली भूमिका चोख बजावली.

error: Content is protected !!