महाबळेश्वरमधील निर्बंध शिथिल करावेत : बावळेकर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने पर्यटनस्थळांवर निर्बंध लावल्यामुळे महाबळेश्वर परिसरातील सर्वच पॉईंट हे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पॉईंट पुन्हा सुरू करण्यासाठी येथील व्यावसायिकांच्या शिष्ठमंडळाने पालकमंत्री व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली, अशी माहिती माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांनी दिली

महाबळेश्वर येथील पॉईंट बंद करण्यात आल्याने महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ खुले असले तरी, पर्यटक या पर्यटन स्थळाकडे पाठ फिरविण्याचा धोका वाढला आहे. असे झाले तर महाबळेश्वर या थंड हवेचे ठिकाणी लॉकडाउनसारखी परिस्थिती ओढवणार आहे. असे झाले तर येथील सर्वच उद्योग व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे म्हणून आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर येथील विविध व्यावसायिकांचे एक शिष्टमंडळाने पालक मंत्री व जिल्हाधिकारी शेखरसिह यांची भेट घेतली व महाबळेश्वरकरांची कैफियत त्यांच्या समोर मांडली.
शिष्ठमंडळाच्या भेटीप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, डी एम बावळेकर, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, तौफिक पटवेकर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अंकुश बावळेकर, सी. डी. बावळेकर, रमेश चोरमले, अनिल केळगणे, अभय डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यटकांची गर्दी होणार नाही, याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. अशाच पर्यटकांना महाबळेश्वर व पाचगणी या शहरात सोडावे, शहरातील हॉटेल ही ५० टक्के क्षमतेनेच भरली जातात.

error: Content is protected !!