एका दिवसात ३० कि.मी. रस्त्याचे डाबरीकरण ; विश्‍वविक्रमाला गवसणी

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे म्हासुर्णे (एसएच- १४७) या ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम एका दिवसात पूर्ण करून विश्‍वविक्रमाला गवसणी घालण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने ही विश्‍वविक्रम कामगिरी केली. या दुर्मीळ कामाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. रविवारी राजपथ इन्फ्राकॉनने पुसेगाव- म्हासुर्णे रस्त्याचे काम एका दिवसात पूर्ण करून विश्वविक्रम रचत महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त अनोखे अभिवादन केले. कंपनीच्या सुमारे ५०० अधीकारी आणि कर्मचाऱ्यांनी १५० वाहने आणि मशिनरीच्या साहाय्याने यासाठी परिश्रम घेतले. हा विश्वविक्रम होत असताना त्याचे लाईव्ह चित्रीकरण लिम्का बुकच्या टीम ने पहिले. त्याचा एक प्रतिनिधी या विश्वविक्रमची नोंद घेण्यासाठी उपस्थित होता.

error: Content is protected !!