सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : उंब्रज, ता. कराड येथील पाटण- पंढरपूर राज्यमार्गावर हजारे मळा येथील एक बंगला चोरट्यांनी फोडला. चोरट्यांनी दरवाजाच्या तीन कड्या कटावणीने तोडून झोपेत असणाऱ्या सात जणांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारुन बेशुद्ध करून ही धाडसी चोरी केली. त्यांनी सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मंगळवार दि. ७ डिसेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
उंब्रज ता. कऱ्हाड येथील राज्यमार्गावर हजारे मळा येथे प्रशांत राजाराम टंकसाळे यांचा बंगला आहे. टंकसाळे यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाला तीन कड्या आहेत, या कड्या सहजासहजी तोडणे कठीण मात्र मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा या कड्या व कोयंडा कटावनीने उचकटून घरात प्रवेश केला. घरातील झोपलेल्या सात सदस्यांच्या नाका तोडांवर गुंगीचा स्प्रे मारुन बंगल्यातील एका खोलीत असणाऱ्या लोखंडी कपाटातील ड्रावर उचकटून चोरट्यांनी ड्राव्हरमधील ३ तोळे सोन्याच्या वजनाची मोहनमाळ, अर्ध्या तोळ्याचे सोन्याच्या वजनाची अंगठी, चांदीचा छल्ला यासह रोख रक्कम असा मिळून सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
You must be logged in to post a comment.