इनोवेशन साताराचे पहिले पाऊल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : इनोवेशन साताराच्या अनुषंगाने चालू झालेल्या सातारा जिल्ह्याच्या विकासात्मक चळवळीचे पाहिले पाऊल आज पडले. अथांग या मराठी वेबसिरीस च्या चित्रीकरणाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी वेबसिरीस चे सर्व कलाकार व इतर व्यवस्थापक उपस्थित होते.

Innovative Satara च्या उद्देशाने चित्रपट तसेच मालिका वेबसिरीस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यात चित्रीकरण व्ह्याव तसेच त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा आणि जिल्ह्यातील युवा कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा व काम करण्याची संधी मिळावी हाच आमचा या मागील उद्देश.

याच अनुषंगाने आज पहिले पाऊल पडले याचा अभिमान व आनंद नक्कीच आहे. यावेळी निर्मात्या तेजस्विनी पंडित, दिग्दर्शक जयंत पवार तसेच इतर सर्व कलाकार उपस्थित होते.

मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीचे कलाकार, निर्माते व दिग्दर्शक मित्रांना माझे आवाहन असेल की सातारा जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आपणास चित्रीकरण करायचे आहे त्यांना नक्कीच आग्रहाचे निमंत्रण राहील व आमच्याकडून लागेल ते सहकार्य मिळेल.

error: Content is protected !!