सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विजयादशमी दसऱ्याच्या पारंपरिक उत्साहाला आनंदोत्सवाची जोड देत आज साताऱ्यात शाही सिमोल्लंघन सोहळा साजरा झाला. परंपरेनुसार सूर्यास्ताला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परंपरेप्रमाणे जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी श्री भवानी तलवारीचे पूजन केले. त्यानंतर जलमंदिर येथून भवानी तलवारीच्या पुजनानंतर पोवई नाक्यापर्यंत ही भव्य शाही मिरवणूक काढण्यात येत असते. मात्र, कोरोेनाच्या पार्श्वभूमीवर ती रद्द करण्यात आली. मात्र, तलवार पूजनानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस याठिकाणी वर्षानुवर्षे परंपरागत शाही सीमोल्लंघन सोहळा साजरा करण्यात येतो. जलमंदिर येथील तुळजाभवानी मंदिरात भवानी मातेच्या तलवारीचे विधिवत पूजन केले. जलमंदिर पॅलेस ते पोवई नाकापर्यंत चालणारी भव्य शाही मिरवणूक मात्र रद्द करण्यात आली आहे. छत्रपतींच्या काळापासून ही मिरवणुकीची ही परंपरा आहे. इतक्या वर्षांनी मागील दोन वर्षांपासून ही परंपरा खंडित होत आहे. यंदा हा शाही सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
You must be logged in to post a comment.