रिपाइं (आठवले गट) नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्व तयारीने उतरणार : अशोक गायकवाड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रिपब्लिकन पक्ष (आठवले) जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्व तयारीने उतरणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय पक्ष संलग्नित आघाडीशी युती अथवा स्वतंत्र पॅनेल असे दोन्ही पर्याय आमच्यासमोर उपलब्ध आहेत. सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांपैकी किमान ५० जागा ताकदीने लढविणार आहे

गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात सहा नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत. याबाबतची घोषणा होऊन सहा दिवस झाले आहेत. याबाबत भाजप पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. पण, फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला या निवडणुकीत सर्व पर्याय खुले आहेत. जो पक्ष आम्हाला न्याय देईल, त्यासोबत आम्ही जाऊन निवडणूक लढवणार आहोत.

error: Content is protected !!