सातारा नगरपालिकेची निवडणूकीत रिपाइं आठवले गट ताकदीने लढविणार : अशोक गायकवाड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): ‘सातारा शहरातील तरुणांना संधी देण्यासाठी त्यांची मजबूत अशी फळी निर्माण करणार आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढविणार आहोत,’ अशी माहिती ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी आप्पा तुपे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, ‘देशाला तरुणांची गरज आहे. तरुणांना संधी आणि जबदारी देण्याची आवश्यकता आहे. नगरपालिका निवडणुकीत तरुणांनी एकत्र यावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. सातारा पालिकेच्या ८ ते ९ प्रभागात आमची ताकद आहे. त्यामुळे निवडणुकीत तरुणांना उतरवणार असून आमची आघाडी असणाऱ्या पक्षाने बरोबर घेतले तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढणार आहे. नवीन मतदार आमच्याबरोबर आलेतर ही निवडणूक आम्हाला जड जाणार नाही.

error: Content is protected !!