सातारा जिल्हा मातंग आघाडीतर्फे रामदास आठवलेंचा सत्कार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा रिपाई मातंग आघाडीच्यावतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मातंग समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष आण्णा वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक रघुनाथ बाबर, जिल्हाध्यक्ष किशोर गलफाडे, शहराध्यक्ष मधुकर घाडगे, जावली तालुका अध्यक्ष खुडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भिसे, जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव भिसे, भादे गावचे मेजर जाधव, ओंकार तपासे, मंदार चांदणे, सचिन कांबळे, फलटण तालुका अध्यक्ष घोलप, हुमगाव जावळीचे भिसे, जिल्ह्यातील सर्व मातंग आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मातंग समाजाच्या आरक्षणासह बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आर्टीची स्थापना करावी. सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे, अण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरित सुरू करावे, दलित महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने ठोस कृती कार्यक्रम राबवावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

error: Content is protected !!