किसनवीर चालवणे हे आता मोठं आव्हान आहे. परंतु ते आम्ही करू : अजित पवार

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कारखाना चालवणे येड्यागबाळ्याचे काम नाही. एक पण संस्था नीट चालवायची नाही अन् दुसर्‍यांच्या नावाने पावत्या फाडायच्या. किसनवीर चालवणे हे आता मोठं आव्हान आहे. परंतु ते आम्ही करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.

वाढे, ता. सातारा येथे आयोजित केलेल्या विविध विकासकांच्या उद्घाटनप्रसंगी दिली.यावेळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, खा. श्रीनिवास पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, सुनील माने, बाळासाहेब सोळस्कर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

अजितदादा म्हणाले, आम्ही बंद पडलेले कारखाने सुरू केले आहेत. सोमेश्वर कारखान्याची अवस्था वाईट होती पण आता कारखाना 8 हजार 500 मेट्रीक टनाने चालला आहे. माळेगाव कारखाना 9 ते 9500 ने चालला आहे. छत्रपती कारखाना 3500 ने चालत होता तो 7 ते 7500 मेट्रीक टन गाळपाने चालला आहे. 52 हजार सभासद ही काही छोटी गोष्ट नाही. कारखान्याबद्दल बैठक घेवून काय लाईन ऑफ अ‍ॅक्शन असली पाहिजे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने काय मदत केली पाहिजे? सहकार विभागाने काय निर्णय घेतले पाहिजे? बँकांकडून काय मदत घेतली पाहिजे? शॉर्ट, लाँग टर्मचे निर्णय असतील ते घ्यावे लागतील. पवारसाहेब म्हणतात अजित निर्णय घेताना पुढील 25 वर्षाचा विचार करायचा तात्पुरता निर्णय घ्यायचा नाही. ही त्यांची शिकवण आहे.

error: Content is protected !!